Home क्राईम आईसह दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत आढळले

आईसह दोन लेकरांचे मृतदेह विहिरीत आढळले

0
110

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कनाशी येथील शेतात एका महिलेसह तिचा मुलगा व मुलगी यांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कनाशी येथील शेतात विहिरीत आई, मुलगा आणि मुलगी असे तिघांचे मृतदेह तरंगताना आढळल्याची घटना, बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. गायत्री दिनेश पाटील (वय ४३) या मुलगा खुशवंत दिनेश पाटील (वय १०) आणि मुलगी भैरवी पाटील (वय ८) हे तिघे कनाशी शिवारातील आपल्या शेतात गेले होते. सायंकाळी ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी भडगाव पोलिसांत पोलिस पाटील अनिल पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती अद्याप आलेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound