Home Cities अमळनेर अमळनेर पोलीस स्थानकाचा प्रभार दिलीप भागवतांकडे !

अमळनेर पोलीस स्थानकाचा प्रभार दिलीप भागवतांकडे !

0
43

अमळनेर प्रतिनिधी । येथील पोलीस निरिक्षक अंबादास मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी भुसावळ बाजारपेठचे दिलीप भागवत यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.

शहरातील एका धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर काढण्यामुळे वाद चिघळले होते. १६ रोजी पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी अनधिकृत बॅनर काढण्याची कारवाई केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, गायकवाड यांची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांविरुद्ध पोस्ट टाकून गायकवाड बेपत्ता झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बुधवारी भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound