“सुपर स्प्रेडर कोरोना चाचणी” करणे आवश्यक- मुख्याधिकारी

खामगाव प्रतिनिधी । त्यावश्यक सेवेमध्ये दुकाने सुरु ठेवण्यासाठी ज्या दुकानांना/व्यवसायांना सुट देण्यात आली आहे. त्या भागातील दुकानदारांनी/व्यावसायीकांनी “सुपर स्प्रेडर कोरोना चाचणी” करणे आवश्यक असल्याचे खामगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी सांगितले आहे.

माहे फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या संख्येमध्ये दिवसे दिवस वाढ होत आहे. खामगांव शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता खामगांव शहरात कोविड नियमांची कडक अंमल बजावणी करण्यात येत आहे.  खामगांव शहरातील विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवेमध्ये दुकाने सुरु ठेवण्यासाठी ज्या दुकानांना/व्यवसायांना सुट देण्यात आली आहे. त्या भागातील दुकानदारांनी/व्यावसायीकांनी “सुपर स्प्रेडर कोरोना चाचणी” करणे आवश्यक आहे, कोरोना चाचणी केलेल्या दुकानदारांनाच लॉक डाऊन काळामध्ये निर्धारित वेळेत दुकाने चालु ठेवता येतील,  जे दुकानदार/व्यावसायीक कोरोना चाचणी करणार नाहीत, त्यांना त्यांचे दुकाने/व्यावसायीक आस्थापना सुरु ठेवता येणार नाही, याची सर्व दुकानदार/व्यावसायीक यांनी नोंद घ्यावी.  खालील नमुद केलेल्या ठिकाणी त्या त्या भागातील दुकानदारानी/व्यावसायीकांनी “सुपर स्प्रेडर कोरोना चाचणी” करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र नगरपरिषदेकडून प्राप्त करुन घ्यावे. 

सुपर स्प्रेडर कोरोना चाचणी करण्याचे ठिकाण व दिनांक  ज्या भागातील दुकानदारांनी / व्यावसायीकांनी चाचणी करावयाची आहे ते पुढील प्रमाणे 

दि. 25.02.2021 गुरुवार रोजी नगरपरिषद कार्यालय खामगांव गरपरिषद परिसराजवळील व बस स्टँड जवळील, दुकानदार / व्यावसायीक / फळविक्रेते / ॲटोचालक व त्यांचे नोकर वर्ग

दिनांक 26.02.2021 शुक्रवार नगरपरिषद, दवाखाना, नांदुरा रोड नगरपरिषद दवाखाना जवळील, टॉवर जवळील, शाळा क्र. 6 जवळील, पोलीस स्टेशन जवळील दुकानदार/व्यावसायीक/फळविक्रेते/ॲटोचालक व त्यांचे नोकर वर्ग

दिनांक 27.02.2021 शनिवार जि. प. मुलांची शाळा, नांदुरा रोड, खामगांव जि. प. शाळा नांदुरा रोडवरील/जवळील पोलीस स्टेशन जवळील दुकानदार/व्यावसायीक/फळविक्रेते/ॲटोचालक व त्यांचे नोकर वर्ग

दिनांक 28.02.2021 रविवार, घाटपुरी नाका घाटपुरी नाका जवळील दुकानदार/व्यावसायीक/फळविक्रेते/ॲटोचालक व त्यांचे नोकर वर्ग

दिनांक 01.03.2021 सोमवार  कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील दुकानदार/व्यावसायीक/फळविक्रेते/ॲटोचालक व त्यांचे नोकर वर्ग

दिनांक 02.03.2021 मंगळवार पंचशिल होमीओपॅथी हॉस्पीटल जवळील दुकानदार/व्यावसायीक/फळविक्रेते/ॲटोचालक व त्यांचे नोकर वर्ग.

 

 

Protected Content