Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथील ज्ञानेश्वर गायके यांचा प्रामाणिकपणा;सापडलेले पाकीट केले परत

चाळीसगाव येथील ज्ञानेश्वर गायके यांचा प्रामाणिकपणा;सापडलेले पाकीट केले परत


b360e1ce 4571 4795 af1e 049bb5baf7c9

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी ज्ञानेश्वर गायके यांना आज शहरातील चरण पेट्रोल पंप येथे एक पाकीट सापडले. या पाकिटात चार एटीएम कार्ड, पॅन कार्ड, व १३०० रुपये असा ऐवज त्यांना आढळून आला. तसेच पाकीट मालकाचे ओळखपत्र मोबाईल नंबर ही त्यात त्यांना मिळाल्याने त्यांनी पाकीट मालक नारायण तोर यांना फोन करून बोलावून घेतले व त्यांचे पाकीट परत केले.

नारायण तोर हे लातूर येथील रहिवासी असून तालुक्यातील हातले येथे कृषी सेवक म्हणून कार्यरत आहेत. हल्लीच्या स्वार्थी जगात अशाप्रकारे प्रामाणिकपणे एखाद्याची वस्तू व पैसे परत करणे हा दुर्मिळ भाग असल्याने ज्ञानेश्वर गायके यांचे सगळ्यांनी कौतुक केले असून नारायण तोर यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound