Home क्राईम कुख्यात आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद

कुख्यात आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद

0
35


 भुसावळ प्रतिनिधी । येथे मोटारसायकलसह अन्य चोर्‍या करून फरार असणार्‍या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ येथे गुरक्र- ७१/ २०१९ भा द वि कलम-३७९ प्रमाणे मोटार सायकल चोरी केले बाबत गुन्हा दिनांक २९.०१.२०१९ रोजी १४.२५ वाजता दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळलेल्या गुप्त बातमी वरून सदर मोटार सायकल आरोपी नामे सादिकअली ईबादत अली जाफरी उर्फ इराणी उर्फ सादिक जाफरी इराणी उर्फ सादिक परवेज शेख (आतंक)वय-२९ रा.पापा नगर, भुसावळ याने सदर गुन्ह्यातील मोटार सायकल ३०,०००/- रु कि ची बजाज पल्सर चोरी केल्याचे समजले होते. संबंधीत आरोपी याला यास पुणे येथून अटक करण्यात आलेली आहे. त्याने बुलडाणा, खामगाव, शेगाव येथे चैनतोडीचे गुन्हे केले असून त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त असून बुलढाणा पोलीस आरोपीचा लवकरच ताबा घेणार आहेत.

सदरची कारवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांचा मार्गदर्शनखाली पो हे का सुनील जोशी ,पो ना सुभान तडवी,पो का विकास सातदिवे अशीनी केली आहे. तसेच या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक श्री देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. सुभान तडवी करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound