Home Cities जळगाव डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
44

 

जळगाव, प्रतिनिधी ।  डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  

 डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात छत्रपती शिवजी महाराज यांची माहिती तसेच त्यावर आधारित प्रश्नावली, शिवरायांचा पोवाडा, अफजल खानाचा वध प्रसंग, शिवरायांचे स्तुती गीतं आणि इ. ३ री ची विद्यार्थिनी तनिष्का वाघ हिने सादर केलेला ‘स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा’ हा प्रसंग यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ विद्यार्थ्यांना व्हाट्सएपच्या ग्रुपवर पाठवण्यात आला. शिवरायांचे स्तुती गीत संगीत शिक्षक विजय पाटील, तुषार पुराणिक व सहकारी शिक्षकांनी म्हटले. या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम प्रमुख संध्या काटोले व योगेश जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

 

 


Protected Content

Play sound