रावेर प्रतिनिधी । येथील गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर प्रत्येक कर्मचार्याची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी नविन इमारती मध्ये शिप्ट झालेल्या पंचायत समितीत प्रत्येक स्वतंत्र कॅबिन भेट देऊन कर्मचार्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.
रावेर पंचायत समितीत नविन बांधकाम झालेल्या इमारतीत कार्यालयीन दप्तर शिप्ट करण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी प्रत्येक कॅबिन भेट देत कर्मचार्यांशी वार्तालाप साधला. त्यांनी कर्मचार्यांना येणार्या समस्या जाणून घेतल्या यावेळी एक ग्राम सेविका आपल्या लहान बाळ घेऊन गट विकास अधिकारी यांच्या समोर बालसंगोपनाची रजा मागत असतांना सौ. दीपाली कोतवाल यांनी क्षणाचीही विलंब न करता त्यांची रजा मंजूर केली.