फर्निचरच्या दुकानातुन ७० हजार रुपये लंपास

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील फर्निचर दुकानातुन अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपये असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील भारत डेअरी बस स्थानकानजीक प्रमोद भागवत पाटील रा. मोंढाळे ता. पाचोरा यांचे बंडु फर्निचर नावाचे दुकान आहे. सदर दुकानातील कपाटात दि. १० रोजी प्रमोद पाटील यांनी काळ्या रंगाच्या रेक्झिंग बॅगेत ७० हजार रुपये रोख, त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बंधन बॅंकेचे व जळगांव जनता बॅंकेचे चेकबुक ठेवले होते. दरम्यान प्रमोद पाटील हे ग्राहकांना फर्निचर दाखवत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेली बॅग लांबवली. काहीवेळा नंतर प्रमोद पाटील यांना बॅंकेत जायचे असल्याने सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदिप सोनवणे हे करीत आहे.

 

Protected Content