Home क्राईम जळगावात बंद घरातून १८ हजारांचे दागिने लांबविले

जळगावात बंद घरातून १८ हजारांचे दागिने लांबविले


जळगाव प्रतिनिधी । कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबियांचे बंद घर फोडून चोरट्यांनी १८ हजार ४०० रुपयांचे दागिने लांबवले. ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेबीबाई अविनाश पाटील (वय ४०, रा. एसएमआयटी कॉलेज परिसर) यांच्या घरी चोरी झाली आहे. बेबीबाई ह्या लहान बहिण, आई यांच्या सोबत राहतात. ७ रोजी सर्व कुटुंबीय मालमत्तेच्या कामासाठी धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे गेले होते. याच रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्याचे कानातले टॉप, रिंग, पेंडल, सोन्याची नथ असा १८ हजार ४०० रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार शेजारचांच्या लक्षा आला. त्यानुसार बेबीबाई यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound