जामनेर येथे लॅपटॉप चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीस अटक

जळगाव प्रतिनिधी । जामनेर येथील जितेंद्र वसंत पाटील यांच्या ई  सेवा केंद्रातून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरुन नेणार्‍या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मंगळवारी अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

अक्षय प्रकाश छाडेकर वय २३ रा. भोई गल्ली, पाळधी ता.जामनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जामनेर शहरातील नवकार प्लाझा येथील दुकानातून लॅपटॉप चोरीला गेला होता. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांनी अक्षय छाडेकर यास पाळधी ता. जामनेर येथुन शिताफीने अटक केली. अक्षय प्रकाश छाडेकर हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याला पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content