जळगाव प्रतिनिधी । रामपेठेतील यांची दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामपेठेत मुरलीधर खडके (वय-५०) रा. रामपेठ जळगाव हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवार ३ रोजी रात्री ८ वाजता त्यांनी त्यांची (एमएच.१९.सीए.३०२८) क्रमांकाची दुचाकी ही घरासमोर उभी केली होती. दुस-या दिवशी गुरूवारी त्यांना घरासमोर दुचाकी दिसून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात शोध घेवून सुध्दा ती मिळून न आल्यामुळे अखेर चोरी झाल्याची खात्री झाली. अखेर शनिवारी खडके यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.