पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील वॉर्मिग वॉक करीत असलेल्या दोन महिलांना चिरडून वाहन चालक पसार झाला होता. नशिराबाद रोडवरील टोयोटा शोरुम मधे अपघातग्रस्त वाहन आढळून आल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन चालक फरार झाला आहे. वाहन क्रमांकावरुन वाहन मालकाचे नाव निष्पन्न झाल्याने अखेर आज दुपारी चार वाजता वाहन चालक पाचोरा पोलीसांना शरण आला. त्यानंतर पोलीसांनी त्याचेवर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामनेर ता. पाचोरा येथे दि. ४ रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अनिता शाहादू पाटील (वय – ४४) व मनिषा साहेबराव पाटील (वय – ५०) या महिलांना एम. एच. १९ सी. एफ. ९९९ या वाहनाने चिलडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. वाहनचालक आपल्या वाहनासह पसार झाला होता. पोलिसांनी वाहनाच्या तुटलेल्या स्फेअरपार्ट व सिम्बॉल वरुन वाहनाचा शोध घेतला होता व वाहन ताब्यात घेतले होते मात्र वाहन मालकाचे नाव वंदना बोरसे असे निष्पन्न झाल्याने वाहन चालक विनोद सुकलाल लासुरकर (वय – ४२) रा. खिरवड ता. रावेर हा दुपारी चार वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात स्वत:हुन हजर झाला.
वाहन चालक विनोद सुकलाल लासुरकर हा वाहन मालक वंदना बोरसे यांचा सख्खा भाऊ असुन वंदना बोरसे यांचे पती नाना बोरसे हे पाटबंधारे विभागात डेप्युटी इंजिनिअर म्हणुन सेवेत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते सद्यस्थितीत शेती व्यवसाय करीत असुन वंदना बोरसे व नाना बोरसे यांचा मुलगा पुणे येथे उच्च शिक्षण घेत असल्याने वंदना बोरसे यांचा भाऊ तथा वाहन चालक विनोद लासुरकर व पती नाना बोरसे हे गेल्या दोन दिवसांपुर्वी मुलास भेटल्यासाठी गेले होते. मुलाची भेट झाल्यानंतर स्वत:चेच वाहन असल्याने ते मुलासही सोबत घेऊन दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता पुण्याहुन जळगांव येथे येण्यासाठी निघाले होते. मात्र दि. ४ रोजी पहाटे ४ वाजता माॅर्निंग वाॅकसाठी निघालेल्या दोन महिलांना चिरडून पसार झाले होते. वाहन चालक विनोद लासुरकर याच्या सांगण्यानुसार महिला अचानक वाहना समोर आल्याने मी घाबरुन गेल्याने माझ्याकडुन अपघात झाला. असा पोलिसांना जबाब दिला असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी दिली.