Home धर्म-समाज सातगावला जवानांच्या माता – पित्यांचा सत्कार

सातगावला जवानांच्या माता – पित्यांचा सत्कार

0
31

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील शिवराय ग्रुपच्या सदस्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवराय ग्रुप प्रत्येकवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवनवीन उपक्रम राबवीत असतो. यावर्षी शिवराय गृपने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या माता – पित्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवव्याख्याते सचिन देवरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी प्रत्येक नागरिकांनी जीवनामध्ये कसं जगावं याचा उपदेशही यानिमित्त केला. शिवराय ग्रुपचे सदस्य दिपक काळे, मयूर मंदाडे, अंकुश गवळी, कैलास पाटील, वैभव चव्हाण, शुभम खैरनार, आदित्य पाटील, शुभम परदेशी, अमोल ननवरे, अमोल बोरसे, आकाश भुसारे, स्वप्निल राजपूत, पंकज माळी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी डी. आर. वाघ, उत्तमराव मनगटे पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. रितेश महाले यांनी केले. तसेच यावेळी गजानन लाध पाटील यांनी गावात पाचशे झाडे लावण्याचा संकल्पही केला.


Protected Content

Play sound