भुसावळ प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांचा मोबाईल हिसकावून एका भामट्याने पळ काढल्यानंतर सुरक्षा बलांनी अवघ्या चार तासात त्यांचा मोबाईल परत मिळवून दिल्याची घटना घडली आहे.
आमदार संजय सावकारे हे विदर्भ एक्सप्रेसने सोमवारी रात्री मुंबई येथे जात असतांना भुसावळ सोडल्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून एकाने पळ काढला होता. या प्रकरणी त्यांनी चाळीसगावच्या लोहमार्ग पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती.
यानंतर लोहमार्ग पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासांमध्ये या चोरीचा छडा लावला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील एका तृतीयपंथियांकडून हा मोबाईल जप्त करण्यात आला. अर्थात, आमदारांचा मोबाईल असल्याने पोलिसांनी इतकी तत्परता दाखविली हे मात्र खरे…!