चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील तांबोळे गावातील जवान मणीमुर(आसाम) येथे चकमकीत गोळी लागली व त्यातच तो शहीद झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी उघडकीस आल्याने तांबोळे गावांसह तालुका वासीयांवर शोककळा पसरली आहे.
जवान सागर रामा धनगर (वय-२३ रा.तांबोळे ता. चाळीसगाव) हा गेल्या तीन वर्षपूर्वी औरंगाबाद येथून वीर जवान सैन्यदलात भरती झाले होता. बेळगांव (कर्नाटक) येथून एक वर्षाची खडतर सैन्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पोस्टिंग दिल्ली येथे करण्यात आली होती. व गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली मणिपूर (आसाम) येथे करण्यात आली होती. परंतु काळाने घात केला व जवान सागर धनगर हे आपले कर्तव्य बजावत असतांना गोळी लागून आज शहीद झाले. वीर जवान सागर यांच्या पश्चात आई व एक मोठा भाऊ आहे. सागर हा लहान असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटूंबाची जबाबदारी एकाप्रकारे तेच सांभाळत होते. परंतु काळाने खूप मोठा घात केला. ते आज आपल्यातून निघून गेले. आईने लोकांकडे काबाडकष्ट करून दोघ मुलांचे संगोपन केले होते. मात्र नियतीला दुसराच हवं होतं. वीर जवान सागर रामा धनगर याची पार्थिव उद्याला सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबई येथे आणले जाणार आहे. अंत्यविधी वेळ अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही. या निधनाच्या वार्तेला चाळीसगांव तालुक्याचे तहसीलदार अमोर मोरे यांनी दुजोरा दिला आहे