Home आरोग्य जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले; ४० रूग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले; ४० रूग्ण कोरोनामुक्त

0
33

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजच ४० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सुदैवाने आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज दहा तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजच्या आकडेवारी

जळगाव शहर- १२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-९, अमळनेर-०, चोपडा -०,पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल -०, एरंडोल -०, जामनेर-१, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-०, बोदवड -० आणि इतर जिल्ह्यातील रूग्ण -२ असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात एकुण ५६ हजार ९७६ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार २७० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ३५१ रूग्ण विविध कोरोना रूग्णालया उपचार घेत आहे. आज सुदैवाने जिल्ह्यात एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound