अवैध वाळू वाहतूक ; ट्रॅक्टरचालकावर गुन्हा

 

जळगाव : प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील रोडवरून विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी मिळाली. गुरूवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पोलीसांनी कारवाई केली. कारवाई करतांना ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पो. कॉ . गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content