दहीगाव ग्राम पंचायतीत प्रथमच मागासवर्गीय समाजाला कारभारी होण्याचा बहुमान

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित परिवर्तन विकास पॅनलने नऊ जागेवर दणदणीत विजय झाला असुन दहीगाव ग्राम पंचायतीच्या इतिहासात प्रथम मागासवर्गीय समाजाला गावाचा कारभारी होण्याचा बहुमान मिळला आहे. 

या पॅनलने आपल्या नांवा प्रमाणेच गावाच्या राजकीय समीकरणात परिवर्तन घडवुन मागील १० वर्षापासुन असलेली भाजपाच्या ताब्यातील ग्राम पंचायत आपल्या ताब्यात खेचुन आणी असुन , या निवडणुकीत भाजपाप्रणीत लोकमान्य पॅनलचा चार जागांवर विजय झाला होता. आज यावल तहसील कार्यालयात सरपंच आरक्षण काढण्यात आले त्यात सरपंचपदासाठी आरक्षण अनुसूचित जाती निघाल्याने २२ वर्षीय सर्पमित्र अजय बाळू अडकमोल या युवा तरूणास गावाचा प्रथम नागरीक होण्याचा बहुमान मिळाला आहे .  दहिगाव ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच आरक्षणामुळे मागासवगीय समाजाला न्याय मिळाला आहे. त‌‌्यामु ळे समाजा बांधवांमध्ये अत्यानंद व्यक्त होत असून, आरक्षण जाहीर होताच गावात फटाक्यांची आतिषबाजी होऊन दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी आणी काँग्रेसप्रणीत पॅनल प्रमुख किशोर मधुकर महाजन यांचे निवासस्थानापासून सर्व नवनिर्वाचित सदस्यांची व नूतन होणाऱ्या सरपंच  भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 यात परिवर्तन पॅनलचे प्रमुख किशोर महाजन गुलाब बाबुराव चौधरी ललित विठ्ठल पाटील कृष्णा पितांबर पाटील अरुण पाटील वजीर पठाण ईबा पिंजारी यांचेसह नवनिर्वाचित चीत ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी आशा पाटील रजनी बडे मुमताज भी कमाल का पल्लवी महाजन वंदना चौधरीजी व कार्यकर्ते आणी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थिती होते .

 

Protected Content