रावेर प्रतिनिधी । पाच वर्षांपूर्वी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने १२ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली आहे. पिडीत मुलीला न्याय मिळाल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून निघत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी अकिल शाह जब्बर शाह रा. रावेर याने सन-२०१५ मध्ये अत्याचार केला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भुसावळ न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर सरकारी वकील खडसे यांनी युक्तीवाद केला. आज न्यायालयात आरोपी अकिल याला हजर करण्यात आले. न्यायालयाने दोषी ठरवत १२ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली. न्या. भन्साळी यांनी हा निकाल दिला आहे. शिक्षेमुळे अशा अप्रवृत्त कृती करणारे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून पीडित मुलीस न्याय मिळाला अशी सर्वसामान्यातून भावना निर्माण होत आहे. नमूद आरोपीची जळगाव सबजेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे.