पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यात आज सोमवारी कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीकरणास ग्रामीण रुग्णालयात प्रारंभ करण्यात आले. सर्वप्रथम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी ‘कोविशील्ड’ लस घेतली.
‘कोविडशिल्ड’ लसीकरणाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, माजी नगरसेवक गणेश पाटील, न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मीक पाटील, शिवसेना शहर अध्यक्ष किशोर बारावकर, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, स्वीय्य सहाय्यक राजु पाटील उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यात पहिल्या टप्प्यात ग्रामिण रुग्णालय पाचोरा, ग्रामिण रुग्णालय पिंपळगाव (हरे.), प्राथमिक आरोग्य केंद्र, वरखेडी, लोहारा, नांद्रा, लोहटार व नगरदेवळा अतंर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी सुपरवायझर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका व आशा स्वयमसेविका यांना कोरोना व्हायरस प्रतिकारक लस देण्याचे सुरू झाले असून १२३ कर्मचाऱ्यांना व्हाट्स अप द्वारे संदेश आले असुन यापैकी दोन आशा स्वयमसेविकांना ताप आलेला असल्याने त्यांनी सदरची लस टोचून घेण्याचा नकार दर्शविला आहे.
आज सायंकाळपर्यंत १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा अंदाज आहे. लसीकरणाचे काम परिचारीका जोत्स्ना पाटील, निता राठोड, नैना वाघ, वैशाली राठोड, मंगला कोळी यांनी केले. लसीकरणासाठी अर्जुन पाटील, नितीन कुलकर्णी, शरद कोळी, अमोल मापारे, किशोर सावळे, मनोज पाटील, दिपक मोरे यांनी सहकार्य केले.
लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही – डॉ. समाधान वाघ
पाचोऱ्यात सर्व प्रथम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी कोरोना व्हायरसची प्रतिकारक लस टोचून घेतली. लस टोचल्यानंतर सुमारे तीन तासांनंतर डॉ. समाधान वाघ यांच्याशी संवाद साधला असता मला कुठल्याही प्रकारची लक्षणे जाणवत नसुन आपली कोरोना पासुन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या व्हाट्स अप वर संदेश आल्यानंतर प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी नागरिकांना केले आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/251310506364983