चाळीसगाव प्रतिनिधी । भालचंद्र नेमाडेद्वारा लिखीत कादंबरीत लभान-बंजारा समाजातल्या स्त्रियांबद्दल अश्लिल लिखाण केल्याबद्दल लेखक व प्रकाशक या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंजारा समाज संघटनांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भालचंद्र वनाजी नेमाडे (रा. सांगवी ता.यावल जि. जळगाव) द्वारा लिखीत हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबईद्वारा जुलै २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आली. या कादंबरीला साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५ साली मिळाला आहे. मात्र ह्या कादंबरीत हरिपुरा लभान-बंजारा समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले असून समाजातील स्त्रियांविषयी अश्र्लील लिखाण त्यात केले आहे. देशातील बारा कोटी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कादंबरी लेखक भालचंद्र नेमाडे व प्रकाशक भटकळ पॉप्युलर या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंजारा समाज संघटनेकडून करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1010209586055295