Home Cities जळगाव युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे अल्पदरात शासकीय योजना शिबीराचे उद्घाटन (व्हिडीओ)

युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे अल्पदरात शासकीय योजना शिबीराचे उद्घाटन (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांडे डेअरी चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ शिवसेना महानगर आणि युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे अल्पदरात शासकीय योजना शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याहस्ते आज सकाळी १० वाजता करण्यात आले.

नागरीकांना तहसील कार्यालयात किरकोळ कारणासाठी फेऱ्या मारव्या लागतात. नागरीकांची अडचण दुर करण्यासाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांनी पुढाकार घेवून शिवसेना महानगर यांच्या सहकार्याने आज या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २१ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. शिबीरात अल्पदरात जनधन आरोग्य योजना, पॅनकार्ड, मतदान कार्ड, स्मार्ट कार्ड, महात्मा फुले जनआरोग्य योजना, ज्येष्ठ नागरीक कार्ड, श्रावणबाळ पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना यासह आदी योजना नागरीकांसाठी अल्पदारात उपलब्ध करून दिले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/3789653061091660


Protected Content

Play sound