भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील शिवारात बिबट्याची मादी आपल्या बछड्यांसह दिसून आल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी दिनकर बरकले यांच्या शेतात बिबट्या आढळला होता. त्यानंतर बुधवारी रात्री मादी बिबट्या दोन बछड्यांसोबत दिसून आली. त्याच दिवशी मोंढाळे रस्त्यावरील जगन शिंदे यांच्या शेतातही ते दिसून आले. सध्य रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, कांदा, भुईमूग, या पिकांची शेतकर्यांनी लागवड केलेली आहे. आठवड्यातून चार दिवस रात्री कृषी पंपांना विजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकर्यांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. यातच बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.