Home Cities एरंडोल भुषण बैसाणे यांना विशेष सेवा पदक

भुषण बैसाणे यांना विशेष सेवा पदक


Erandol

एरंडोल प्रतिनिधी । येथील मूळ रहिवाशी तथा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भुषण विनायक बैसाणे यांना गडचिरोली येथील नक्षल ग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

भुषण बैसाणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड पोलीस स्टेशन मध्ये सुमारे साडेतीन वर्ष सेवा करून नक्षल ग्रस्त भागात चांगली कामगिरी केली असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालकांचे विशेष पदक प्राप्त झाले आहे.भुषण बैसाणे हे सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विनायक बैसाणे यांचे पुत्र असुन पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे यांचे बंधु आहेत. श्री बैसाणे यांना पदक मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी त्यांचे कौतुक केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound