Home Cities यावल कोरोना काळातील वार्तांकनाबद्दल पत्रकार अय्यूब पटेल यांचा सत्कार

कोरोना काळातील वार्तांकनाबद्दल पत्रकार अय्यूब पटेल यांचा सत्कार

0
23


यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत जीव धोक्यात घालून वार्तांकन केल्याबद्दल आज लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे यावल तालुका प्रतिनिधी अय्यूब पटेल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार करण्यात आला.

जगभरात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या संकटकाळात नागरीकांना प्रत्येक दिवसाची माहीती देवुन खर्‍या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीकोणातुन आपले स्वता:चे जिव धोक्यात घालुन वृत्तसंकलनाच्या माध्यमातुन जनजागृतीचे कार्यकरणार्‍या पत्रकारांचा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजीत सत्कार सोहळा आज यावल येथे पार पडला.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकारांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. रवीन्द्रभैय्या पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहीणीताई खडसे-खेवलकर, राष्ट्रवादी महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ. कल्पनाताई पाटील, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, गिरधर काशीनाथ पाटील यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात लाईव्ह ट्रेंड न्युज चे यावल तालुका प्रतिनिधी अय्युब पटेल यांच्यासह पत्रकार डी. बी. पाटील, राजु कवडीवाले, सुनिल गावडे, अरूण पाटील, तेजस यावलकर, शेखर पटेल, शब्बीर खान, भरत कोळी , विक्की वानखेडे, बेबाबाई धनगर यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले व युवक राष्ट्रवादीचे अ‍ॅड. देवकांत पाटील यांनी केले .


Protected Content

Play sound