आमदार पाटलांच्या गावात राडा; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पाचोरा प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली असली तरी निवडणुकीच्या वादातून आमदार किशोर पाटील यांचे मूळ गाव असणार्‍या अंतुर्लीत दोन गटांमध्ये राडा झाला असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पाचोरा पोलिसांनी सदर घटनेची सविस्तर माहिती जानुण घेत ११ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा तर ४ जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हयाची नोंद पाचोरा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अंतुर्ली बु” प्र. पा. ता. पाचोरा येथे दि. १५ रोजी मतदान सुरू असतांना मतदारांच्या चिठ्ठी वरुन दोन गटात शाब्दीक चकमक झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेत प्रकरण शांत केल होते. परंतु कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्याने मतदानाच्या दुसऱ्या दिवशी दि. १६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास परस्पर विरोधी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालुन सदरचे प्रकरण पाचोरा पोलिस स्टेशनला पोहचले. यात पंकज प्रकाश पाटील रा. अंतुर्ली बु” प्र. पा.  यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन प्रकाश पाटील, अजय सुरेश‌ पाटील, प्रविण भगवान पाटील, सागर विठ्ठल पाटील, लक्ष्मण दशरथ पाटील, साहेबराव राजाराम पाटील, भुषण साहेबराव पाटील, भरत सुरेश पाटील, अक्षय रघुनाथ पाटील, भैय्या विक्रम पाटील, भैय्या धनराज पाटील सर्व रा. अंतुर्ली बु”, प्र. पा. यांनी फिर्यादीस व त्याचे मित्र नरेंद्र राजेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत  लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

जीवेठार मारण्याची धमकी देत जिल्ह्यातील जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने या आरोपीं विरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे हे करीत आहे. तर अजय सुरेश पाटील यांचे फिर्यादीवरून गावातील रिक्षा स्टाॅप जवळ पृथ्वीराज आबा राजपुत, दिलीप देवसिंग राजपुत, जयपाल दिलीप राजपुत, शिवदास नामदेव राजपुत सर्व रा. अंतुर्ली बु” प्र. पा. यांनी मला लाठ्याकाठ्यांनी व चापटांनी मारहाण केल्राने त्यांचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content