Home Cities मुक्ताईनगर खडसेंची कन्या शारदा चौधरींचीही ईडीकडून चौकशी

खडसेंची कन्या शारदा चौधरींचीही ईडीकडून चौकशी

0
99


मुंबई प्रतिनिधी । भोसरी येथील भूखंड व्यवहाराच्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या शारदा खडसे-चौधरी यांनी देखील आज ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली असून त्यांची देखील चौकशी करण्यात येत आहे.

आज सकाळी एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या देखील ईडी कार्यालयात आल्या आहेत. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहार हा शारदा खडसे यांच्या नावावर आहे. त्यामुळे शारदा खडसे यांची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर पदाचा दूरूपयोग करून व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांनी आपली मुलगी व जावई यांना आपल्या पदाचा वापर करून भूखंडाच्या माध्यमातून मदत केल्याचा ईडीला संशय असून याचीच चौकशी करण्यात येत आहे.

यासाठी आता एकनाथराव खडसे यांच्या सोबत त्यांची कन्या शारदा खडसे-चौधरी यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. खडसे पिता-पुत्री गेल्या सुमारे तीन तासांपासून ईडीच्या कार्यालयातच आहेत.


Protected Content

Play sound