Home क्राईम पिंप्राळा येथील तरूण बेपत्ता; रामानंदनगर पोलीसात नोंद

पिंप्राळा येथील तरूण बेपत्ता; रामानंदनगर पोलीसात नोंद

0
67

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील पांढरी प्लॉट भागातून ३० वर्षीय तरूण हा घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाले आहेत. रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिल सुभाष मराठे (वय-३०) रा. पांढरा प्लॉट पिंप्राळा हा तरूण जैन इरिगेशन कंपनीत काम करतो. ३० जुलै २०१८ रोजी दुपारी ३ वाजता कंपनीत कामाला जाण्यासाठी घरातून निघाला. नातेवाईकांनी आज येईल उद्या येईल असे करत आजपर्यंत त्यांची वाट पाहिली परंतू सुनिल मराठे हा घरी न आल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात वडील सुभाष तुकडू मराठे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश भावसार करीत आहे.


Protected Content

Play sound