जळगाव प्रतिनिधी । मु.जे.महाविद्यालयाच्या पाठीमागे पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातातून अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून मोबाईल लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मानव छोटुलाल पाटील (वय-१८) रा. गुलमोहोर कॉलनी जळगाव हा विद्यार्थी असून बारावीचे शिक्षण घेतो. बुधवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मु.जे.महाविद्यालयाच्या पाठीमागे गणपती मंदीराजवळ लहान भावासोबत पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर अज्ञात दोन जणांनी येवून मानव पाटील यांच्या भावात हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून पळ काढला. दोघी भावंडांनी दुचाकीवर असलेल्या दोघांचा पाठलाग केला असता अज्ञात भामटे दुचाकीवर पळून गेले. याप्रकरणी मानव पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.