जळगाव प्रतिनिधी । अयोध्येत श्रीराम मंदीराच्या निधी समर्पन व संकलनाच्या जनजागृती व्हावी यासाठी आज स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिनाचे औचित्य साधून तरूणांनी आज सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
श्रीराम मंदीराच्या निधी संकलनासाठी बजरंग दल व विविध सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. आज १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकांनद यांच्या जयंती आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. ग्यानी गुरूप्रितसिंग आणि हभप योगेश महाराज यांनी भगवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला सुरूवात करण्यात आली.
शिवतीर्थ मैदान, रिंगरोड, पुन्हा कोर्टचौक, टॉवर चौक, भिलपूरा, रथ चौक, श्रीराम मंदीर, विठ्ठल मंदीर, नेरी नाका, पांडे डेअरी चौक, सिंधी कॉलनी, डी-मार्ट, काव्यरत्नावली चौक, मु.जे.महाविद्यालय, महाराणा प्रताप चौक आणि आकाशवाणी चौकातील बाबा टॉवर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
यारॅलीत ग्यानी गुरूप्रितसिंग, हभप योगेश महाराज, प्रा. यजूवेंद्र महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यावाहक हितेश पवार, शहरकार्यवाहक राजेंद्र ध्याने, बजरंग दलाचे राकेश लोहार, मानस शर्मा, पियुष रावघे, बंटी बाविस्कर यांच्यासह आदी पदाधिकारी आदी सहभागी झाली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/902338243868293