मोहाडी रोडवर गोडावूनला आग; अडीच लाखाचे नुकसान (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवर असलेल्या गोडावून अचानक लागलेल्या आगीत सुमारे अडीच लाखांचा माल जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. ही आग कश्यामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, शिवाजी मोहन आस्वार (बारी) (वय-३६) रा. रामेश्वर कॉलनी हे किरकोळ विक्रीचे व्यवसायिक आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कुरकुरे पाकिटांचा होलसेल व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी त्यांनी मोहाडी रोडवरील खूपचंद साहित्या टॉवर जवळ एक भाड्याने गोडावूनही घेतले आहे. काल १० रोजी त्यांनी सुमारे अडीच लाखांचा माल गोडावून मध्ये भरला होता. आज ११ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अचानक गोडावूनला आग लागल्याने कुरकुऱ्यांच्या पाकिटे जळून खाक झाली आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. महापालिकेचा एक बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1337461586587872

Protected Content