Home क्राईम पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ; भावाकडून बहिणीच्या नवऱ्याची हत्या

पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ; भावाकडून बहिणीच्या नवऱ्याची हत्या


पुणे (वृत्तसंस्था) बहिणीने घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पुण्यात भावाने तिच्या प्रियकर पतीस चाकूने भोसकून हत्या केली आहे. सुलतान महमंदहुसेन सय्यद ( वय २४, रा. महंमदवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील महंमदवाडी येथील सुलतान सय्यद याने एक वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. हा प्रेम विवाह त्या तरुणीच्या घरातील मंडळींना मंजूर नव्हता. या प्रकरणावरून त्या तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत आणि सुलतानमध्ये वाद देखील झाले होते. सुलतान हा कॅम्प परिसरात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करायचा. शनिवारी देखील नेहमी प्रमाणे दुकानावर असताना रात्रीच्या सुमारास अरबाज आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले आणि त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. या वादामध्ये अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तेथून त्या तिघानी पळ काढला. या प्रकारानंतर सुलतानला नागरिकांनी जवळील रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आरोपींचा शोध घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound