भुसावळ प्रतिनिधी । भुसावळच्या आजी-माजी आमदारांनी कंडारीकरांना पाणी देखील देऊ शकले नसल्याने त्यांना मते मागण्याचा अधिकार नसल्याचा हल्लाबोल आज पीआरपीचे नेते जगनभाई सोनवणे यांनी केला.
आज दिनांक ५ रोजी कामगार नेते जगन सोनवणे यांनी भिमालय जनसंपर्क कार्यालय येथे आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी कामगार नेते जगन सोनवणे म्हणाले की, तापी नगर जवळ असून ही पाण्यासाठी कंडारी गावच्या ग्रामस्थ नागरीकांनी अनेक आंदोलन करावी लागली. माजी आमदार संतोष चौधरीच्या आमदाराकीच्या काळात आणि आमदार संजय सावकारे हे सुद्धा तीन वेळा आमदार व एक वेळा पालकमंत्री आणि राज्यमंत्री राहिलेले आहेत.या दोन्ही आजी-माजी आमदारांच्या सत्ता काळात कंडारी गावकऱ्यांच्या तापी नदी जवळ असतांना ही पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.आंदोलने करावी लागतात.मग या आजी माजी दोन्ही आमदारांना व त्यांच्या पॅनलला मते मागण्याचा काय अधिकार आहे?
कंडारीच्या नागरिकांनी आजी माजी आमदारांच्या उमेदवारांना पाडून गरीब होतकरू व विकासाचा ध्यास असलेल्या उमेदवारांना मतदान करावे.परंतु आजी-माजी आमदारांच्या पॅनलला मतदान करू नये.कारण आजी-माजी आमदारांनी कंडारी गावाचा विकास त्यांच्या सत्ता काळात केलेला नाही.पाण्याचा सुद्धा प्रश्न कंडारी गावात प्रलंबित आहेत.तेव्हा कंडारी गावच्या नागरिकांनी नोटांचे बटन दाबवे.किंवा जे कंडारी गावचा विकास करतील अशा सर्व नवीन चेहऱ्यांना संधी दयावी.असे आवाहन कामगार नेते जगन सोनवणे,मा.नगरसेविका व मा.पं.स.सदस्था सौ.पुष्पाताई सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला कामगार नेते जगन सोनवणे,राकेश बग्गन, चंदू पहेलवान,महेंद्र गाढे,प्यारेलाल यादव,समीर शहा,मनोज जाधव,शिवकुमार गुप्ता, बुद्धभूषण गायकवाड,महेंद्र कोळी,अशोक कोळी,सुनील कोळी आदी यावेळी उपस्थित होते.