जळगाव प्रतिनिधी । हॅप्पी मिरर फाउंडेशन आणि जवान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ईश्वर मोरे यांचा जन्म दिनाच्या निमित्ताने विशेष संकल्प म्हणून दिल्लीत बसलेल्या शेतकरी संघटनांच्या समर्थनार्थ व शेतकऱ्यांच्या कृषि विधेयक कायद्याला मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खुले विचारमंथन चर्चा सत्राचे तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, जवान फाउंडेशनचे उपाध्यक्ष जमशेद शेख, प्रहार संघटनेचे संतोष पाटील, लोक संघर्षाच्या प्रतिभा शिंदे सचिन धांडे, शेतकरी नेते सुभाष पाटील, एस. बी. पाटील, शिवाजी पाटील अमळनेर, विवेक रणदिवे चाळीसगाव, जयवंत देशमुख चाळीसगाव, योगेश निकम रावेर, जळगाव जागृत म्हणजे शिवराम पाटील, राकेश वाघ, किरण भामरे, दीपक गुप्ता, धर्मेश पलवे अशा अनेक सामाजिक व शेतकरी नेत्यांनी पाठिंबा देत जवान फाऊंडेशन व हॅप्पी मिररचे कौतुक केले. या लाक्षणिक उपोषणाला जळगावकर शेतकरी बंधू, लोकनेते, सामाजिक संस्था यांचा पाठिंबा मिळाला. याप्रसंगी जेवण फाऊंडेशनचे ईश्वर मोरे हॅपी सेंटरचे प्राध्यापक डॉक्टर आशिष जाधव उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/3528713430583696