Home Cities जळगाव भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजकपदी डॉ . नरेंद्र ठाकूर

भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजकपदी डॉ . नरेंद्र ठाकूर

0
33

 

जळगाव, प्रतिनिधी । एरंडोल येथील नगरसेवक व भूलवैद्यकशास्त्रतज्ञ् डॉ. नरेंद्र ठाकूर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडी ( ग्रामीण )च्या मुख्य जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ . नरेंद्र ठाकूर यांना नुकतेच जिल्हा भाजप अध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपा कार्यलय वसंत स्मृती येथे नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ. निलेश पाटील, महानगर वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. धर्मेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, कार्यालय प्रमुख प्रकाश पंडित ह्यांची उपस्थिती होती.  डॉ. नरेंद्र ठाकूर हे एरंडोल परिक्षेत्रात सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून ह्यापूर्वी त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी ह्या पदावर कार्य केलेले आहे.  त्यांच्या नियुक्तीबद्दल माजी मंत्री व वैद्यकीय आघाडी प्रभारी आमदार गिरीश महाजन ,
महाराष्ट्र जनजातीय क्षेत्र प्रमुख ऍड. किशोर काळकर, संघटनमंत्री रवी अनाजपूरें, खासदार रक्षा खडसे , खा. उन्मेश पाटील , आमदार चंदुलाल पटेल, भाजप वैद्यकीय आघाडी राज्य संयोजक डॉ. अजित गोपछडे, उत्तर महाराष्ट्र सयोंजक डॉ. प्रशांत पाटील, एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी ,लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, तालुका भाजप अध्यक्ष मच्छिन्द्र पाटील व तालुका सरचिटणीस अमोल जाधव यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound