Home आरोग्य देशभरातील नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस : आरोग्यमंत्री

देशभरातील नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस : आरोग्यमंत्री


 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या लसीकरणाचा आजपासून सराव सुरू झाला असतांनाच आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व नागरिकांना ही लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे.

आजपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन अर्थात सराव चाचणी सुरू झाली आहे. यातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची चाचणी मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे.

कोरोनाची लस नेमकी नेमकी कितीला मिळेल याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संशयकल्लोळ सुरू असतांना आता हर्षवर्धन यांनी केलेली घोषणा महत्वाची मानली जात आहे.


Protected Content

Play sound