यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे या आदीवासी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असुन, आदिवासी बांधवांना मोठया संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, डोंगरदे येथे गेल्या तीन महिन्यांपासुन पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असुन, गावास पाणीपुरवठा करणारी एकमेव विहिरही आटण्याच्या मार्गावर आहे. या विहिरीत अगदी एक आठवडा पुरेल एवढाच जलसाठा आहे. तो ही अत्यंत दुषीत असूनही आदिवासी बांधवांना त्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. या आदीवासी बांधवांच्या गावात प्रसिद्ध असे मंदिर आहे या मंदिर परिसरातील विहिरीस चांगले पाणी असुन गावातील लोकांची पिण्याच्या पाण्याची समयस्या मार्गी लागु शकते पण मंदीराचे पुजारी यासाठी कुठल्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याची आदिवासी बांधवांची तक्रार आहे. |निवडणुक आली की, सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींना आमच्या गावाची वाट दिसते. मात्र निवडणुक संपली की, आमच्याकडे कुणीही पाहत नसल्याची तक्रार गावाचे पोलीस पाटील अमीरा पावरा व असंख्य आदिवासी बांधवांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. कगावाची पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी, अशी अपेक्षाही काही भगीनींनी व्यक्त केली.
पहा । नागरीकांनी पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली धडपड