पाळधी प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील बिअर शॉपीजवळून तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना २९ रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पवन संजय सोनवणे (वय-२६) रा. पाळधी खुर्द हे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे कामाच्या निमित्ताने ४० हजार रूपये किंमतीची (एमएच १९ बीझेड ४४५६) क्रमांकाची दुचाकी आहे. २८ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता ते शहरातील एस.पी.बीअर शॉपीसमोर दुचाकी पार्किंगकरून लावली. दुसऱ्या दिवशी २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जागेवर दुचाकी मिळून आली नाही. दुचाकीचा शोध सर्वत्र घेतला असता सापडली नाही. पवन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.