Home Cities अमळनेर लोण येथे सलूनच्या दुकानाला आग; दोन लाखांचे नुकसान

लोण येथे सलूनच्या दुकानाला आग; दोन लाखांचे नुकसान


अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील लोन बुद्रुक येथील दीपक आत्माराम वारुळे यांचे वारूळी हेअर आर्ट या दुकानाला अचानक आग लागल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
या बाबत सविस्तर असे की, वारूळे हेअर आर्ट रात्री अचानक आग लागल्याने दुकानातील 50 लाख रुपयाची प्लेटिना गाडी जळून खाक झाली दुकानातील सर्व वस्तू जळून नष्ट झाल्यामुळे सदर कुटुंबाचे रोजगाराचे साधन नष्ट झाल्याने परिवारावर मोठे संकट निर्माण झालेली आहे. उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने परीवार उघडयावर पडला असून त्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी परीवारातील सदस्यांनी केली आहे. सदर आग रात्री लागल्याने कशामुळे लागली याबाबत समजू शकले नाही.
मारवड पोलिस स्टेशनचे पीएसआय निलेश शेबडे यांनी भेट देऊन चौकशी करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound