Home क्राईम जळगावातून बेपत्ता तरुण आढळला पुण्यात

जळगावातून बेपत्ता तरुण आढळला पुण्यात

0
122


जळगाव प्रतिनिधी । ड्युटीला जात असल्याचे सांगून घरातून निघालेला आदित्य सातपुते हा तरुण बेपत्ता झाला होता. अखेर चार दिवसांनी त्या तरुणाचा शोध घेण्यास रामानंदनगर पोलिसांना यश आले असून, त्याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागेश्वर कॉलनीतील आदित्य विसपुते हा २१ रोजी ड्युटीला जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न आल्यामुळे वडिलांनी दिलेल्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, हा तरुण पुण्यातील एका कंपनीत प्रशिक्षण घेत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पुणे गाठत त्याला ताब्यात घेऊन कुटुंबीयांचे स्वाधीन केले आहे. दरम्यान, कमी पगार असल्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी असावी व स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून पुण्यात निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.


Protected Content

Play sound