मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस पाठविल्याचे वृत्त असून याबाबत टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.
याबाबत वृत्त असे की, एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रवेश करतांना त्यांनी ईडी आणि सीडी असे वाक्य जोडून खळबळ उडवून दिली होती. यानंतर आता एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली असून त्यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे वृत्त टिव्ही ९ या वाहिनीने दिले आहे.
दरम्यान, नेमक्या कोणत्या प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली याची माहिती समोर आलेली नाही. तसेच खुद्द खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, अमोल मिटकरी, अंकुश काकडे आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत टिव्ही नाईनला प्रतिक्रिया दिली आहे.