Home क्राईम नवीन बसस्थानकात विवाहितेच्या पर्समधून चोरट्यांनी लांबविले सोन्याचे दागीने

नवीन बसस्थानकात विवाहितेच्या पर्समधून चोरट्यांनी लांबविले सोन्याचे दागीने


जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकात जामनेर बसमध्ये चढत असतांना विवाहितेच्या पर्स मधून १२ हजार रूपये किंमतीचे दागीने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी २ वाजता घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, निर्मला विलास वाणी (वय-४८) रा. नशिराबाद ता. जि.जळगाव ह्या कुटुंबियांसोबत राहतात. बुधवार १६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास निर्मला वाणी ह्या आई दुर्गाबाई सवकर व बहिण मंगलाबाई आखाडे यांच्यासह चुलतबहिणीच्या लग्नासाठी जाण्यासाठी नशिराबाद येथून रिक्षाने जळगाव येथे दुपारी १.२० वाजता नवीन बसस्थानकात आल्या. तिघांना साबळदबारा गावी जाण्यासाठी त्यांनी दुपारी २ वाजता बस लागली होती. जामनेर बसमध्ये चढत असतांना निर्मला वाणी च्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रूपये किंमतीची ४ ग्रॅम सोन्याची ठुशी व ८०० रूपये किंमतीचा चांदीचा कमरेचा छल्ला लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात शोधाशोध सुरू केली मात्र मिळून न आल्याने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. निर्मला वाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound