जळगाव प्रतिनिधी । कामानिमित्त पायी घरी निघालेल्या तरूणाच्या हातातील मोबाईल अज्ञात दोन जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढल्याची घटना मंगळवार ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीत घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, भुषण दिलीप पाटील (वय-३५) रा. दत्त नगर मेहरूण हे एमआयडीसी खागसी कंपनीत कामाला आहे. ८ डिसेंबर रोजी कामावर असतांना दुपारी मुलाची तब्बेत बिघल्याने ते कंपनीतून घरी पायी जात होते. एमआयडीसीतील स्ट्रीन फ्लो कंपनीसमोर पत्नीशी मोबाईलवर बोलत असतांना मागुन अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवरून येवून भुषण पाटील यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धुमस्टाईल पसार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ.सुधीर साळवे, आसीम तडवी व चेतन सोनवणे यांनी संशयीत आरोपी योगेश जयसिंग चव्हाण (वय-२२) रा. नानीबाई हॉस्पीटल जवळ पंचमुखी हनुमान मंदीराजवळ जळगाव आणि विजय बाळू भालेराव (वय-२२) सुप्रीम कॉलनी प्रेमाबाई शाळेजवळ जळगाव या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करणे बाकी आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक अमोल मोरे व रतीलाल पवार हे करीत आहे.