जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एसएसबीटी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात लेफ्ट राईट माईंड प्रा. ली. पुणे येथील कंपनीच्या टेकनिकल टीमने डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखती मध्ये महाविद्यालयातील संगणक विभागाच्या ५ विद्यार्थ्यांची कंपनीत निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्नेहल पाटील, रुपेश झोपे, प्रशांत पाटील, हर्षल गुरव, परमेश्वर राजपूत यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. एस. ए. ठाकूर, संगणक विभाग प्रमुख डॉ. जि. के. पटनाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या मुलाखत प्रक्रियेसाठी सौरभसिंघ राजवत, सुशांत बाहेकर, प्रदीप सोळंकी, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.