शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करा

 

जळगाव, प्रतिनिधी ।शहरातील ज्या भागात अमृत योजनेचे काम पूर्ण झाले आहे तेथील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी रिद्धी जान्हवी फाउंडेशनतर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

शहरात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या कामांमुळे शहरातील रस्ते खड्डे युक्त झाले असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यांवरून पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. तरी शहरातील रस्ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. याप्रसंगी अध्यक्ष चित्रलेखा मालपाणी, उपाध्यक्ष पद्मावती दालवाले, सचिव हर्षा सोनवणे, खजिनदार दीपा तापडिया आदी उपस्थित होते.

Protected Content