आळंदी । कोरोनाच्या पार्श्वभूमिवर माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आज पहाटे मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीची पहाटपूजा आज करण्यात आली.
कार्तिकी एकादशीला येणार्या संजीवन समाधी सोहळ्याच्या आधी प्रशासनाने नियमावली जारी केली होती. याच्या अंतर्गत परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे. परिणामी आज मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. मुख्य सोहळा १३ डिसेंबर रोजी याच प्रकारे पार पाडण्यात येणार आहे.
आज पहाटे पावणे दोन वाजता मुख्य महापुजा व अभिषेकास सुरुवात झाली. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. साडेतीन वाजता धुपारती होऊन समाधीचे दर्शन उपस्थित मोजक्या भाविकांसाठी खुले करण्यात आले.
पहाट पूजेवेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, खासदार संजय जाधव यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी यांच्यासह निमंत्रित मान्यवर यावेळी उपस्थित होते.