Home धर्म-समाज रावेर शहरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक

रावेर शहरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक


रावेर प्रतिनिधी । शहरापासून हाकेच्या अंतरावर एका तरूणाला गावठी कट्टा आणि काडतूसह आज रावेर पोलीसांनी अटक केली आहे. रावेर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपी साईम जानबाज बेलदार हा दुपारी (एमएच ३९ ई ८८१९) क्रमांकाच्या दुचाकीने रावेर शहरात येत असल्याचे समजले. पो.नि.वाकोडे यांनी पथक तयार करून संशयित आरोपी साईम बेलदार याला गावठी कट्टा, एक काडतूस आणि दुचाकीसह अटक केली आहे. त्याच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाईन पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मंदार पाटील, विठ्ठल देशमुख, प्रमोद पाटील, विशाल पाटील, कुणाल सोनवणे, महेश मोगरे, पुरषोत्तम पाटील यांनी केली.


Protected Content

Play sound