चाळीसगाव प्रतिनिधी । देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्र भरातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या भारत बंदमध्ये चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्ष यांचा संपूर्ण सहभागी राहणार आहेत.
चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होऊन यात उद्या बंदचे आवाहन करण्यासाठी एकत्रित चाळीसगाव शहरातून फेरी काढण्याचे ठरवले असून सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी केले. या बैठकीस नगरसेवक शाम देशमुख, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, अशोक खलाणे, रमेश शिंपी, दिलीप घोरपडे, प्रदीप देशमुख, रवींद्र जाधव, देवेंद्र पाटील, योगेश पाटील, सुजित राजपूत, जितेंद्र देशमुख, परशुराम महाले, शरदसिंग राजपूत, धनंजय देशमुख, शुभम पवार, मिलिंद शेलार आदी उपस्थित होते. सर्व व्यापारी बांधव व्यवसायिक यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य करावे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/295777961807694/