शेंदुर्णी प्रतिनिधी । महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील गरूड महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
६ डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरुड महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि रासेयो कनिष्ठ व वरिष्ठ विभाग यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, कार्यालय अधीक्षक सतीश बावस्कर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अजिनाथ जिवरग, प्रा.प्रमोद सोनवणे, रा.से.यो. कनिष्ठ विभाग कार्यक्रम अधिकारी, रासेयो अधिकारी डॉ. वसंत पतंगे आदी उपस्थित होते.