Home राजकीय संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी कुंदन लहामगे यांची निवड

संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी कुंदन लहामगे यांची निवड

0
49


संगमनेर । येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे नगरसेवक तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक कुंदन लहामगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कुंदन लहामगे यांची आज संगमनेर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ते महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असून फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांचे बंधू आहेत. त्यांच्या मातोश्री या देखील आधी नगरसेविका होत्या.

कुंदन लहामगे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर ना. बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गा तांबे यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तर निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आहे. आपण सर्वसामान्य संगमनेरकरांसाठी काम करणार असल्याचे प्रतिक्रिया कुंदन लहामगे यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound